राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्काराने देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे होणार सन्मानित
पत्रकार प्रताप मोरे बहुजन रत्न पुरस्काराणे होणार सन्मानित

चिखली (प्रतिनिधी) : – बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात तसेच पत्रकार कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून बहुजन समाजाचे कल्याणासाठी उल्लेखनिय कार्य करणारे दै देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे यांची बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे संस्थेचे संपादक प्रशांत डोंगरदिवे यांनी कळविले. .
ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेरघर (महिला आश्रम), लताईबाई अनाथालय, भोकर ता. चिखली जि. बुलढाणा आयोजित मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२५ बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आपण बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून बहुजन समाजाचे कल्याणासाठी सतत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संघर्षातून मिळणारे यश मोठे आहे. यामुळे आपली सदर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी, जेष्ठ पत्रकार, शासकीय अधिकारी व जेष्ठ सामाजिक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. श्री शिवाजी विज्ञान वा कला महाविद्यालय (श्री शिवाजी सिनियर कॉलेज) चिखली जि. बुलडाणा येथे संपन्न होणार आहे. या राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्काराने देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे हे सन्मानित होणार असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .