सपना इंगळे दुबईच्या व्यासपीठावर !अंढेरा ते दुबई प्रवास .

देऊळगावराजा / देवानंद झोटे
आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी बुलडाणा जिल्ह्याचे नेते मनोज इंगळे यांची कन्या सपना इंगळे दुबई येथे नोकरीसाठी रवाना झाली आहे .संघर्षाची शिदोरी आणि शिक्षणाचा ध्यास आई वडील आजी आजोबा यांच्या आशीर्वादाने आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अंगिकारत तिने आपली वाटचाल करत सपनाने तिचे स्वप्न साकार केले आहेत .
माझी मुलगी शिकून मोठी व्हावी आणि मोठ्या पदावर जावी ही मनोज इंगळे यांची इच्छा होती आज सपना दुबईच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या ज्ञान,मेहनत ,आणि आत्मविश्वासाच्या जोरावर झेप घेत असून आपल्या वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केले आहे .संभाजी नगर विमानतळावरून ती मुंबई मार्गे दुबई साठी रवाना झाली तिच्या नव्या प्रवासासाठी तिची आई सुशीला इंगळे ,आजी रुक्मिणी इंगळे वडील मनोज इंगळे देऊळगाव राजा पंचायत समितीच्या माजी सभापती अनिता झोटे यांच्यासह इतर नातेवाईक भावनिक झाले .सपना इंगळे हिने सर्वांचे आभार मानत म्हटले की ही सुरुवात असूनआणि मी ही संधी माझ्या आई वडील आजी आजोबा यांच्या मुळे मिळवू शकले त्यांच्या कष्टांना वंदन.
ही केवळ यशोगाथा नाही ही आहे एका विचारसरणीची ,एका चळवळीची आणि एका बापाच्या स्वप्नाची यशस्वी उधळण .