बुलढाण्यात 31 ॲागस्ट पासून बुध्द संडे धम्म स्कूल भंते यश श्रीलंका यांचे मार्गदर्शन उपासक उपासिकांनी त्यांचा लाभ घ्यावा- धम्मसेवक विजय वाकोडे यांचे आवाहन

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा फुले ,शाहू ,आंबेडकरांच्या विचार सरर्णीच्या व धम्मचळवळीच्या बुलडाणा शहरात बुध्द धर्माचे प्रशिक्षण केंद्र व बुध्दरश्मि महाविहार होत आहे ती एक वास्तू बुलडाणा शहराच्या वैभवात भर पडणारी आहे त्या निर्मीतीचे शिल्पकार भंते यश श्रीलंका यांच्या संकल्पनेतून उभे राहणाऱ्या वास्तूला यांच्या धम्मकार्यालाही बौध्द उपासक उपासिकांनी तनमन धनाने मदत ही कारावी.
प्रत्येक विकसित बुध्द राष्ट्रांमध्ये बुद्ध संडे स्कूल चालू आहे त्या धर्तीवर बुलडाणा शहरातही भंते यश श्रीलंका यांचे उपस्थित धम्म उपासक व उपासिका यांना धम्माची माहीती बुध्दाचे तत्वज्ञान प्रत्येक बुध्द उपासकांना माहीती होण्यासाठी भंते यश मार्गदर्शन करणार आहे. त्या करिता सर्व शहरातील श्रध्दावान उपासक उपासिका यांना कळविण्यात अत्यंत हर्ष होत आहे की, प्रत्येक विकसित बुद्ध राष्ट्रातील संडे धम्म स्कुल प्रमाणे बुलढाणा शहरात सुद्धा प्रथमच पूजनीय यश भंतेजी श्रीलंका, यांच्या हस्ते मैत्रेय बुद्ध विहार नागसेन, खामगाव रोड बुलडाणा यांच्या वतीने नवीन दिशा मिळावी या उद्देशाने त्रिशरण,पंचशील,अष्टगाथा, धम्मपद,शील, समाधी, प्रज्ञा, मानवीय मूल्य जीवनातील शुद्ध आचरण, तथागतांच्या मधुर वाणीतील धम्म, तसेच इतर राष्ट्रातील बुध्द विचार, इतिहास, आणि धम्म शिकवणीचे बाल मनावर “धम्म संस्कार” व्हावे, यासाठी सात वर्षावरील सर्व बालक, बालिका, महिला, पुरुषांसाठी दिनांक 31.08.2025 रोजी, सकाळी 9.00 वाजता मैत्रेय बुध्द विहार नागसेनगर सुंदरखेड खामगाव रोड बुलडाणा येथे आयोजन होत आहे, आणि पुढे दर रविवारी सुरू राहणार आहे. यामधे पूज्यनिय यश भंतेजी आणि त्यांचा संघ शिकवण देणार आहेत.
सर्वांना आदराची नम्र विनंती की, 31 ॲागस्ट पासून दर रविवारी आपण व आपल्या पाल्यासह सहपरिवार उपस्थित राहून धम्म ज्ञानाची, दिव्य शिकवण घेऊन आपले जीवन प्रकाशमान करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धम्मउपासक उद्दोजक विजय वाकोडे यांनी केले आहे.