सामाजिक

आडगाव राज्याच्या मातीतून थेट IIT खरगपूरपर्यंत उड्डाण! – हर्षवर्धन बिल्होरे यांची थेट देशातील टॉप IIT मध्ये घवघवीत यशस्वी निवड!”

सिंदखेड राजा (प्रतिनिधी)
माळरानावर वसलेले, पण संस्कारांची शिदोरी आणि अभ्यासाच्या बळावर उजळत चाललेले आडगाव राजा गाव आज अभिमानाने गर्जत आहे! कारण, या गावाचा सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप पांडुरंग बिल्होरे यांचा चिरंजीव हर्षवर्धन प्रदीप बिल्होरे याने IIT खरगपूर (पश्चिम बंगाल) या देशातील टॉप IIT संस्थेत Biotechnology & Biochemical Engineering या प्रतिष्ठित शाखेसाठी प्रवेश मिळवून गावाचे नाव देशभरात उज्वल केले आहे!

पहिल्याच प्रयत्नात JEE Main आणि Advance या अत्यंत कठीण परीक्षेत घवघवीत यश मिळवत, हर्षवर्धनने जणू आडगाव राज्याच्या ज्ञानदिपाला राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
त्याचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील नाथ व्हॅली शाळेत 1वी ते 10वीपर्यंत झाले, तर 11वी व 12वीचे IIT साठी प्रबळ प्रशिक्षण पुण्यात पूर्ण केले.

ही यशोगाथा म्हणजे जिद्द, प्रामाणिक अभ्यास, आणि पालक व गुरूंचे वेळोवेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन यांचे मूर्त उदाहरण आहे.

गावातील युवकांनी हर्षवर्धनचा आदर्श ठेवावा, असे आवाहन अनेक शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक असलेले प्रदीप बिल्होरे हे सामाजिक क्षेत्रातील सक्रीय व्यक्तीमत्व असून, त्यांचा मुलगा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थेत पोहोचल्याने आडगाव राजा गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.

ग्रामस्थ व इष्टमित्रांकडून हर्षवर्धन व त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button