सामाजिक

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी!


. जालना/ प्रतिनिधी
दलित, वंचित, कष्टकरी, श्रमिकांचा आवाज असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त बोरगाव येथे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष मा. दीपक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकहाणीची उजळणी करत, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, प्रेरणा व जागृतीचे स्फुल्लिंग पेटवणारी भाषणे, अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित अभिवाचन, गीत गायन आणि प्रबोधनपर चर्चा घडून आली.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती –
जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर, गणेश डोके, एकनाथ डोके, दसरथ डोके, मदन डोके, अर्जुन डोके, संजय डोके, शामराव लोंढे, दामोदर लोंढे, दिपक दत्ता डोके, प्रदीप डोके, आनंद लोंढे, आकाश लोंढे, भीमराव लोंढे, प्रकाश लोंढे, रामलाल पत्ते, गणेश पत्ती, शांताबाई लोंढे, सोनाबाई लोंढे, रंजना लोंढे, कुशीवर्ताबाई लोंढे, प्रतीक्षा लोंढे, सुनीता लोंढे, गुंफाबाई लोंढे, कविता लोंढेबालू गोरे यांच्यासह गावकरी आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाज प्रबोधनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा शेवट एकात्मता व बंधुतेचा संदेश देत उत्साहात झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button