खामगाव येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र निषेध, आरोपींवर “मकोका” अंतर्गत कार्यवाही करा_ महेंद्र पनाड

लोणार / प्रतिनिधी खामगाव येथील रोहन पैठणकर या दलित युवकास रात्री बस स्टँड परिसरात एकटा गाठून त्याचे अपहरण करून त्यास निर्मनुष्य ठिकाणी नेले.तेथे त्याला जात विचारून जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा डोळा निकामी झाला त्याच्या नाकाचे हाड मोडले आहे, गब्बू गुजरीवाल रोहित पगारिया व प्रशांत सांगेल अशी मारहाण करणाऱ्या जातीय वाद्यांची नावे आहेत,इतकेच नाही तर रोहन पैठणकर यास विवस्त्र करून त्याचा गायी सोबत व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले योगायोगाने पोलीस पेट्रोलिंग करत असलेल्या गाडीचा सायरन वाजल्याने त्याला अर्ध मेल्या अवस्थेत सोडून हल्लेखोर पसार झाले.या घटनेचा लोणार येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला पुरोगामी महाराष्ट्रात जातीवरून दलितांवर हल्ले करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे याचा यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला व आरोपींवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी केली,तसे निवेदन भाई महेंद्र पनाड यांचे नेतृत्वात तहसीलदार लोणार यांचे मार्फत महामहिम राज्यपाल यांना देण्यात आले यावेळी भाई महेंद्र पनाड ,सुनील देहाडे,युवा अध्यक्ष गौतम गवई,महासचिव पवन अवसरमोल,माजी ता अध्यक्ष श्रावण म्हस्के, रमेश प्रधान, सिद्धार्थ जावळे,अतिश पनाड, संजय लहाने,जगन गवई, संतोष वाकोडे,तेजराव अवसरमोल, अमितेश अंभोरे,रोहित सरदार, मंगेश सरदार,विराट मोरे,रोशन अंभोरे,अक्षय जाधव,सुनील पाडमुख,रुपेश निकाळजे,धीरज अवसरमोल,प्रशिक मोरे,उमेश चव्हाण,रतन मोरे,राजेश पाडमुख,वैभव म्हस्के,शुभम मोरे,राम गायकवाड आदी वंचित चे कार्यकर्ते हजर होते.