भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा मार्फत सनद वाटपाचा लोकाभिमुख उपक्रम!महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना मिळालं स्वामित्वाचं प्रमाणपत्र – गावागावात प्रत्यक्ष जाऊन यंत्रणेचा अनुकरणीय उपक्रम सिंदखेडराजा

सिंदखेड राजा (रामदास कहाळे):सध्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत संपूर्ण राज्यात “महसूल सप्ताह” साजरा होत असून, याच पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाने उल्लेखनीय कार्य केले आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी “स्वामित्व योजना” अंतर्गत नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काची सनद प्रमाणपत्रं वाटप करण्यात आली.भूमी अभिलेख विभाग हा महसूल यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, शेतकऱ्यांच्या जमिनीचे हद्द निर्धारण, पोटहिस्से वाटप, गुंठेवारी, कोर्ट मोजणी, भूसंपादन, बिगरशेती वापर यासारखी कामं या विभागाच्या माध्यमातून पार पाडली जातात. अनेकदा या विभागाच्या निर्णयांमुळे एकाच वेळी काहीजण समाधानी, तर काही नाराजही होतात, पण सिंदखेडराजा कार्यालयातील कर्मचारी वर्गाच्या नागरिकाभिमुख सेवेमुळे विश्वासाचा सेतू मजबूत झाला आहे.योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोनोशी, पळसखेड चक्का आणि गुंज या गावांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट जाऊन मार्गदर्शन शिबीर घेतले आणि सनद प्रमाणपत्रांचे वितरण केले.🔹 सोनोशी गाव: 12,315 ₹🔹 पळसखेड चक्का: 26,600 ₹🔹 गुंज: 32,145 ₹इतक्या रकमेच्या सनद वाटपाने नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.कार्यक्रमावेळी मुख्यालय सहाय्यक मारोती थोरवे, परिरक्षण भूमापक गोपाल वाघमारे, निमतनदार राजाराम चोखट, भूमापक प्रकाश शिंदे, सय्यद शोएब, निवृत्ती वायाळ, संजय नागरे, दस्तगीर शेख, सूर्यकांत कुरंगळ इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जनतेला त्यांच्या हक्काचं स्वामित्व देण्यासाठी शासन आणि महसूल विभागाचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे!