सामाजिक

चिखलीत पार पडला राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार सोहळा .. ऋणानुबंध संस्थेचे कार्य कौतुकास्पद . ॲड साहेबराव सिरसाठ


देऊळगाव राजा/ देवानंद झोटे- महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विचारवंत, साहित्यिक आणि बहुजन चळवळीत सामाजिक कार्य, शिक्षण, साहित्यीक, पत्रकार, अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य , व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यां राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार सोहळयाचे आयोजन ऋणानुबंध समाज विकास संस्था तथा तुकाराम वृद्धाश्रम अनाथलंय, भोकर यांच्या वतीने दिनांक ६ जुलै रोजी शिवाजी हायस्कूल चिखली सभागृहात करण्यात आले होते .ज्यामध्ये पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य ,व उत्कृष्ट कामगिरी करणारे दै देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड साहेबराव सिरसाठ, उदघाटक राष्ट्रवादी नेते मनोज दांडगे तर प्रमुख मार्गदर्शक भीमशक्ती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष भाई कैलास सुखदाने , प्रा. डॉ. सुभाष राऊत, बामसेफचे कुणाल पैठणकर , संत कबीर पत संस्थेचे प्रताप भांबळे , फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकी शिनगारे ,राजेश गवई , त्रीदल संघ माजी सैनिक संघटना जय सायराम , डॉ बाबासाहेब आंबेडकर पत संस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे , संबोधी ग्रुपचे अध्यक्ष एस. एस.गवई , चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे, दिपक मोरे पत्रकार,हिम्मतवंत जाधव , वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू भिसे आदींची उपस्थिती होती ..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड इंगळे यांनी केले तर ऍड साहेबराव सिरसाठ ,भाई कैलास सुखदाने, मनोज दांडगे, एस. एस.गवई , कुणाल पैठणकर , प्रताप भांबळे ,आदीनी भाषणात ऋणानुबंध समाज विकास संस्था तथा तुकाराम वृद्धाश्रम अनाथलयाचे प्रशांत डोंगरडिवे व त्यांच्या पत्नीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले.
यावेळी चिखली ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली R. N. 534/F-1058/2009 द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना महिला आश्रम लताई अनाथलंय, भोकर ता चिखली जि. बुलडाणा च्या वतीने करवीर नरेश आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जयंती निमित्त सन्मान सोहळा आयोजन करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अनुसरून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर १० वी, १२ वी व इतर परीक्षेत उज्वल यश मिळवण्याऱ्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. तसेच बौद्ध वधू वर परिचय घेण्यात आला. ज्यामध्ये बहुजन महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून विविध क्षेत्रात व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दै देशोन्नतीचे पत्रकार प्रताप मोरे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी, प्रास्ताविक ऍड सी पी इंगळे यांनी आभार एस एस साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईजी एन के सरदार, सतीश पैठणे, मनोज जाधव, रघुनाथ गवई, राजेंद्र सुरडकर, पत्रकार विजय खरात, गणेश श्रीवास्तव, दयानंद निकाळजे, यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button