मराठा आरक्षण जी.आर रद्द करावा या मागणी चे निवेदन देण्यासाठी उपस्थित रहावे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष ॲड. संदीप मेहेत्रे यांचे आवाहन

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) –महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जी.आर.चा तीव्र निषेध व्यक्त करत, हा अन्यायकारक व समाजाच्या भावना दुखावणारा जी.आर. तात्काळ रद्द करावा, या ठाम मागणीसाठी सिंदखेडराजा तालुक्यातून संतप्त जनतेतून एकजूट निर्माण झाली असून उद्या दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवार, सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे भव्य निवेदन देण्यात येणार आहे. तरी निवेदन देण्यासाठी सर्व समाजबांधवांनी हजर राहावे असे आवाहन समता परिषद चे तालुका अध्यक्ष ॲड संदीप मेहेत्रे यांनी केले आहे.
तालुका अध्यक्ष ॲड. संदीप सखाराम मेहेत्रे (अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सिंदखेडराजा) यांनी समाजबांधवांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की –
“ शासनाने काढलेला जी.आर. हा समाजाला फसवणारा व अन्यायकारक आहे. तो रद्द होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणूनच प्रत्येक जागरूक नागरिकाने व समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक नातं ठेवणाऱ्या बांधवांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा.”
या आंदोलनाच्या निवेदनाला अधिक प्रभावी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वेळेवर हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजाची ताकद दाखवून शासनाला जागे करण्याची वेळ आली आहे.
📍 ठिकाण: तहसील कार्यालय, सिंदखेड राजा
📅 दिनांक: ०८ सप्टेंबर २०२५ (सोमवार)
⏰ वेळ: सकाळी ११ वाजता
📞 संपर्क: ॲड. संदीप मेहेत्रे – ७५८८५६५००८