मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार:व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग, पाच विधीसंघर्षित आरोपींना अटक

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या मुलीला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावर अत्याचार केला. दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली असून, अत्याचार करणारे पाचही आरोपी स्वतः अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत केले होते. ते व्हिडिओ दाखवून तिला धमकावत तिच्यावर गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार करत होते. ब्लॅकमेलिंगच्या भीतीमुळे ती या अत्याचाराला बळी पडत होती. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. अत्याचार करणारे पाचही आरोपी अल्पवयीन मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर, मुलीच्या आईने तातडीने काळाचौकी पोलिस गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेवर अत्याचार करणारे पाचही तरुण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, नागरिक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. हे ही वाचा… हैदराबादच्या मुलीवर तिघांचा सामूहिक अत्याचार:काम देण्याच्या बहाण्याने कृत्य, परळीतील घटना; आरोपींना अटक काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने परप्रांतीय २० वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले. तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा शिवारात शनिवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सविस्तर वाचा… ‘तुझी इज्जत माझ्या हातात’ म्हणत अल्पवयीन ढोल पथक प्रमुखाकडून तरुणीचा विनयभंग:जबरदस्ती घरी नेत रडका फोटो काढून व्हायरलची दिली धमकी ढोल पथक प्रमुखाने पथकातील अल्पवयीन मुलीला घरी नेत चुकीचा स्पर्श करून विनयभंग केला. त्यानंतर तिचा रडका फोटो काढून ‘तुझी इज्जत माझ्या हातात आहे’ असे म्हणून प्रकरणाची बाहेर वाच्यता केल्यास जे राहील ते शेवटचे राहील, अशी धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री ८ वाजेच्या सुमारास बालाजीनगरमध्ये घडला. या प्रकरणी प्रशांत रवींद्र दळवे (रा. बालाजीनगर) याच्यावर पोक्सोअंतर्गत जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. सविस्तर वाचा…