सामाजिक

चलो बुध्द की ओर महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद व धम्म ध्वज यात्रा 22 ॲागस्टला बुलढाण्यात 

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्म ध्वज यात्रा बोधिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या नागभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली व तमाम नवकोटी जनतेला दिक्षा दिली त्या पावन दिक्षाभूमीतून 17 ॲागस्ट 2025 पासून बुध्दिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने निघनारी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी ॲक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही धम्मध्वज, जनसंवाद यात्रा भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पुज्य भंते रेवत संघनायक इंडीया, पुज्य भंते उपगुप्त कार्यध्यक्ष भिकुसंघ महाराष्ट्र राज्य, पुज्यभदंत हर्षबोधी महास्थवीर बोधगया, पूज्यभंते ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा,कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भिमराव आंबेडकर हे वरील मागणी घेऊन ही धम्मध्वज जनसंवाद दीक्षाभूमी ते चैत्यभूमी ही यात्रा मातृतिर्थ बुलढाणा येथे 22 ॲागस्ट 2025 रोजी बुलडाणा शहरातील महाबोधी बुध्द विहार धम्मगीरी, मलकापूर रोड बुलढाणा जिल्हा बुलडाणा येथे येत आहे. 

   सकाळी 10 वाजता धम्म ध्वजारोहण पुज्य भंते हस्ते होणार आहे व मानवंदना समता सैनिक दल देणार आहे. धम्मध्वज यात्रा दुपारी 12.30 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्यांचे पुजन होणार आहे,यशसिध्दी सैनिक सेवा संघ बुलडाणा हे मानवंदना देऊन धम्मध्वज, जनसंवाद यात्रा यात्रेस प्रारंभ होणार आहे. जयस्तंभ चौक,मेन मार्केट लाईन जनता चौक,कारंजा चौक येथून गर्दे वाचनालय सभागृह येथे जनसंवाद सभा होणार आहे. तरी या धम्मध्वज जनसंवाद यात्रेत बुलढाणा शहरातील व 13 ही तालुक्यातील तमाम आदर्णिय बौध्द उपासक, उपासिका तसेच बुध्दाच्या प्रज्ञा शिल करूणा वर प्रेम करणाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, या धम्मध्वज व जनसंवाद यात्रेत येतांना पांढरे शुभ्र कपडे परिधान करून यावे. या महत्वपूर्ण कार्यक्रमाला प्रत्येक बौध्द उपासक, उपासीकानी ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून उपस्थित राहावे तसेच या यात्रेस बुध्द धम्मात दान परिमितेला फार महत्त्व आहे म्हणून आपआपल्या परिने दान करावे असे आवाहन महाबोधी धम्मगीरी, संबोधी बुध्द विहार, विश्वशांती बुध्द विहार, सम्यक संबोधी बुध्द विहार, सारनाथ बुध्द विहार, जेतवन बुध्द विहार, श्रावस्ती बुध्द विहार, पंचशिल बुध्द विहार, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, शालीन बुध्द विहार,महाबोधी बुध्द विहार, आनंद नगर बुध्द विहार, नालंदा बुध्द विहार, जागृती उपासका संघ, तक्षशिला बुध्द विहार, लुंबीनी बुध्द विहार, क्रांती नगर बुध्द विहार, समृद्धी बुध्द विहार, डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले नगर बुध्द विहार, मैत्री बुध्द विहार, कपीलवस्तू बुध्द विहार, सम्राट अशोक उपासिका संघ बुलडाणा तसेच बुलडाणा शहर सन्मवय समिती, बुलढाणा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button