पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी जळगाव कळकळीत बंद….. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तीन संशयित नावांची अद्याप चौकशी का नाही?__ सुनीता देशमुख यांचा संतप्त सवाल
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी जळगाव कळकळीत बंद….. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तीन संशयित नावांची अद्याप चौकशी का नाही?__ सुनीता देशमुख यांचा संतप्त सवाल

जळगाव (जामोद): / प्रतिनिधी दि.४स्थानिक भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी पंकज देशमुख यांची ३ मे रोजी मृत्यू झाला असून त्या घटनेला आता दोन महिने उलटले तरी पोलिसांनी ती आत्महत्या म्हणून प्रकरण गुंडाळले आहे. परंतु ती आत्महत्या नसून घातपातच आहे, यासाठी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाय हक्क समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देत दिनांक ४ जुलै रोजी जळगाव येथे सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून सर्वांनी या घटनेच्या निषेधार्थ कळकळीत बंद पाडला. मृतकाची पत्नी सुनीता पंकज देशमुख यांना पत्रकारांनी बोलते केले तेव्हा त्यांनी सांगितले की आपण पोलिसांना दिलेले संशयतांमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते सुध्धा आहेत.पोलीस आमची आणि जनतेची दिशाभूल करीत आहे. आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपले बयान नोंदवलेले आहे. पोलीस इतर लोकांची बयाने नोंदवित आहेत परंतु मी जे जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझ्या बयानामध्ये संश्यीतांची जी नावे दिली त्यांची चौकशी पोलिसांनी अद्यापही केली नाही? त्यातील सर्व जनतेमध्ये खुलेआम फिरत असून सर्व सर्वांवर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. पोलिसांवर दबाव आणून पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत .पोलीस सर्वांची दिशाभूल करत आहेत . पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे.म्हणून आपण आणि सर्व जनता सीआयडी चौकशीवर ठाम आहे असे त्या म्हणाल्या.
न्याय हक्क समितीच्या वतीने ह्या प्रकरणी शहर बंद ची यापूर्वीच घोषणा केली होती. त्यानुसार शहर सकाळपासूनच कडकडीत बंद होते. सर्वच पक्षाची राजकीय मंडळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनाचा लढा अधिक व्यापक करू: प्रसेनजित पाटील
पोलिसांवर जनतेचा कसलाही विश्वास राहिलेला नाही. ह्यापूर्वीसुद्धा अशी तीन-चार प्रकरणी झाली आणि ह्याच मंडळीच्या माध्यमातून ती पोलिसांवर दबाव आणून दाबल्या गेली.शासनाने कठोर भूमिका घेऊन या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावीम. सुनीता देशमुख यांच्या मागणीमध्ये तथ्य आहे आणि म्हणूनच सर्व जनता त्यांच्या पाठीमागे आहे. गेल्या साडेतीन दशकामध्ये सुद्धा एवढा कडकडीत बंद कोण्या घटनेच्या निषेधार्थ आपण बघितला नाही. सर्व जनता सुद्धा न्याय हक्क समितीच्या सोबत आहे, हे आज दिसून आले. त्यामुळे ह्याप्रकरणी आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक करण्याची गरज आहे आणि शासनाने तात्काळ सीआयडी चौकशी लागू करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी केली.
घातपाताच्या दिशेने चौकशी व्हावी:डॉ. स्वाती वाकेकर
पंकज देशमुख यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. सुनिता देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही न्याय हक्क समितीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे आहोत. दोन महिने पोलीस प्रगती फक्त टाईमपास सुरू आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यामागे कोण आहेत ,हे सर्व जनतेला माहित आहे. म्हणून सीआयडी चौकशी करावी या भूमिकेवर सुद्धा मी आणि जनता ठाम आहोत असे काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ
वाकेकर म्हणाल्या.
आम्ही तुमचा पण पंकज देशमुख करू: अभयसिंह मारोडे
जन आंदोलन समिती आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. परंतु भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते फेसबुक व्हाट्सअप वर आम्हासारख्यांना धमक्या देत आहेत. तुम्ही ह्या आंदोलनाच्या दूर राहा .या प्रकरणात लक्ष घालू नका अन्यथा तुमचा पण पंकज देशमुख करू !अशा धमक्या आम्हाला भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत , आम्हाला धमक्या देणारे भाजपाची कार्यकर्ते पदाधिकारी कोण आहेत यांची पोलिसांना सुद्धा जाण आहे. तरी पोलीस सुद्धा मूग गिळून बसले आहेत.अशा पोकळ धमक्यांना आम्ही बळी न पडता सुनीता देशमुख यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असे यावेळी न्याय हक्क समितीचे प्रवक्ते अभयसिंह मारोडे म्हणाले.
पंकज देशमुख प्रकरणी सर्व व्यापारी प्रतिष्ठान आज बंद होती. काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उभाठा आणि शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष ह्यासह विविध राजकीय संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी आजच्या बंद मध्ये सहभागी होते. त्यांनी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडून पंकज देशमुख वृत्ती प्रकरणाचा निषेध केला आणि सीआयडी मागणीची चौकशी चे समर्थन केले त्यामुळे न्याय हक्क समितीने जळगाव वाशी यांची प्रतिकृताज्ञता व्यक्त करून आभार मानले.
वेळी शहरातून शांततामय मार्गाने रॅली काढण्यात आली यामध्ये जनक आंदोलन समितीचे सर्व सदस्य प्रोसेनजीत पाटील,डॉ. स्वाती वाकेकर, अभयसिंह मारोडे, भाऊ भोजने, तुकाराम काळपांडे सय्यद नाफीज, रमेश नाईक, रमेश ताडे ,अर्जुन घोलप, इरफान शेट्टी यांच्यासह विविध संघटनांची पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सचिन देशमुख,रंगराव देशमुख यांची अनुपस्थिती:
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणांमध्ये सीआयडी चौकशी करावी यासाठी सातत्याने सर्वात अग्रेसर असणारे राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख रंगराव देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख हे आज जळगाव बंदच्या आंदोलनात सहभागी नव्हते. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. रंगराव देशमुख यांच्या माध्यमातून कपिल कन्स्ट्रक्शन ही मोठे ठेकेदारी प्रतिष्ठान आहे. आपल्या परिवाराचा ठेकेदारी व्यवसाय असल्यामुळे पुढे त्रास होईल ,म्हणून ते घाबरले असावे आणि आज अनुपस्थित राहिले. अशी चर्चा आहे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यावर स्थानिक भाजप गटाकडून दबाव वाढल्यामुळे ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.
ते तसे विधानसभेत बोललेच नव्हते.:
पंकज देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी विधानसभेमध्ये दोन जुलैमध्ये आमदार संजय कुटे यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी पंकज देशमुख चा मृत्यू ही आत्महत्या आहे की घातपात हे मला माहीत नाही. पोलिसांचा तपास हा फार चांगल्या आणि योग्य दिशेने सुरू आहे. परंतु पंकज देशमुख यांची पत्नी आणि परिवार म्हणतो पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास करावा.. असे संजय कुटे यांनी विधानसभेत सांगितले. ते म्हणाले ह्या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय यंत्रणे कडून करावा. सीआयडी कडून तपास करावा असे वाक्य त्यांचे तोंडून निघालेच नाही. त्यामुळे काही वृत्तपत्रांनी सीआयडी तपास करावा अशी आमदार कुटे म्हणाले असे वृत्त दिले होते. त्यांनी सध्याच्या पोलीस तपासावर समाधान व्यक्त केले आणि हा तपास पोलीस फार चांगल्या पद्धतीने करीत आहेत असे ते म्हणाले. पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करत आहेत तर मग सीआयडी तपासाची मागणी आमदार संजय कुटे म्हणूच शकत नाही असा याचा अर्थ होतो.