महाराष्ट्र

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप आणि मोदी सरकारवर तुफान हल्ला – “ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागच नव्हता, ते आज देश चालवतात!” 

नवी दिल्ली / मुंबई (प्रतिनिधी) –

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शब्दांचा भडिमार करत संतप्त हल्ला चढवला.

मोदी सरकारवर थेट आरोप:

“ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात तसूभरही सहभाग नव्हता, ते आज देशाच्या गादीवर बसून राष्ट्रभक्तीचे धडे देतात!”

लाल किल्ल्यावरून दिलेली भाषणं ही फक्त दिखावा – “मोदी जे बोलतात, ते त्यांच्या वागण्यात दिसत नाही. मागील 11 वर्षांत देशाला केवळ खोट्यांचे डोस पाजले गेले!”

 

 

⚔️ RSS वर थेट वार:
सपकाळ म्हणाले – “1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान RSS कुठे होते, याचं उत्तर मोदींनी द्यावं! राष्ट्राच्या लढ्यात गैरहजर राहणाऱ्यांकडून देशभक्तीचे सर्टिफिकेट घ्यायचे का?”
पंतप्रधानांनी RSS बद्दल केलेली वक्तव्ये ही “खोटारडी व बनावट” असल्याचाही आरोप त्यांनी केला.

नेहरू-पटेल यांचा गौरव, भाजपवर फाळणीचा आरोप:
सपकाळ म्हणाले – “पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एकसंध आहे. अन्यथा 600 देश निर्माण झाले असते. भाजप मात्र फाळणीच्या जखमेवर मीठ चोळत राजकारण करतो.”
“फाळणी विभाजन स्मृती दिवस” हा संवेदनांचा अपमान आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

— घोषणांची फसवणूक:
पंतप्रधान मोदींच्या तरुणांना ₹15,000 देण्याच्या नव्या घोषणेवर सपकाळांनी उपहास केला –
“पूर्वी 15 लाख रुपये खात्यात देऊ, 2 कोटी नोकऱ्या देऊ असे सांगितले… पण काय झालं? केवळ लोकांची थट्टा झाली. ही नवी घोषणा देखील फसवीच ठरणार!”

– वन नेशन वन इलेक्शन – लोकशाहीवर घाव:
सपकाळांनी भाजपच्या “वन नेशन, वन इलेक्शन” संकल्पनेलाही धारेवर धरले –
“भाजपची खरी योजना म्हणजे वन लीडर, एकच भाषा, एकच पेहराव, एकच टीव्ही चॅनल आणि एकच जेवण! हा प्रकार हास्यास्पद असून लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे!”

– सपकाळांचा अंतिम संदेश:
“देशाला फसव्या घोषणांचा, इतिहास पुसण्याचा आणि लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांचा खेळ थांबवायचा असेल तर जनतेने जागे व्हायलाच हवं!” 🚩

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button