सामाजिक

हनवतखेड येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामविकासाचा नवा अध्याय! – मोफत वॉटर प्युरिफायर, केसर आंबा कलम, अंगणवाडी साहित्य आणि भांडे वाटपाचा ऐतिहासिक उपक्रम जल्लोषात पार पडला 

 सिदखेड राजा (प्रतिनिधी) –“ग्रामविकास हेच ध्येय – ग्रामविकास हीच चळवळ” या मंत्राखाली हनवतखेड ग्रामपंचायतीने यंदाचा स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणापुरता न ठेवता सामाजिक विकास व लोकहिताचा नवा पायंडा पाडला. श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि केंट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड यांच्या पुढाकाराने मोफत वॉटर प्युरिफायर वाटप, केसर आंब्याची कलम वाटप, शाळा व अंगणवाडी साहित्य वाटप आणि मागासवर्गीय समाजासाठी भांडे वाटप असा भव्य सामाजिक उपक्रम गावात यशस्वीपणे पार पडला.

 

या उपक्रमाचा शुभारंभ युवा नेते मा. सतिशभाऊ कायंदे यांच्या शुभहस्ते, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी, गावातील एका महिलेस पाणी फिल्टर आणि आंब्याची कलम देऊन करण्यात आला. या निमित्ताने गावात “एक घर – एक शुद्ध पाणी, एक आंबा वृक्ष” ही संकल्पना रुजवण्यात आली.

 

🌟 प्रमुख उपस्थिती

 

मा. घुगे साहेब (गटविकास अधिकारी, सिंदखेड राजा)

 

मा. मयुर शर्मा साहेब

 

या मान्यवरांनी ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ पाणी हक्क, तसेच शिक्षण आणि बालकांच्या आरोग्याच्या महत्त्वावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रम गावातील शाळेच्या आवारात सकाळी नेमके ९:३० वाजता आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते आपले वॉटर फिल्टर, आंब्याचे कलम, शाळा व अंगणवाडी साहित्य तसेच भांडी स्वीकारली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी एकता, उत्साह आणि समाजहिताचा अद्भुत संगम दिसून आला.

 

या कार्यक्रमाचे आयोजन 

ग्रामपंचायत हनवतखेड, भगवान बाबा बहुउद्देशीय संस्था व समस्त गावकरी मंडळी – हनवतखेड.गावच्या सरपंच आशाताई संजय जायभाये, उपसरपंच वर्षा कैलास जायभाये ,ग्रामविकास अधिकारी श्री कैलास झिने , बाबासाहेब कैलास जायभाये, राहुल जायभाये, पोलीस पाटील सुरेश मांटे, संतोष जायभाये, पंडित दराडे ,भगवान चित्ते, परसराम शिनगारे, आत्माराम चित्ते, यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांच्या

पुढाकाराने व ग्रामपंचायतीच्या सक्रिय नेतृत्वाखाली हनवतखेडने स्वातंत्र्यदिनाला केवळ राष्ट्रप्रेमाचा दिवस न ठेवता, ग्रामविकासाचा उत्सव बनवला – “गाव बदलणार, जीवन बदलणार” या संकल्पनेला नवी ऊर्जा मिळाली!

हनवतखेड ग्रामपंचायतीची हरित स्वातंत्र्यदिन साजरीकरणाची नवी ओळख! 

ग्रामपंचायतीचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

हनवतखेड – स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने हनवतखेड ग्रामपंचायतीने वृक्षलागवड करून सामाजिक बांधिलकी जपली. ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर व ग्रामस्थांनी उत्साहात सहभाग घेत हरित आणि स्वच्छ गाव घडविण्याची शपथ घेतली. या उपक्रमाने गावात पर्यावरण संवर्धनाचा नवा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button