राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !

बुलढाणा/ प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दैनिक भारत संग्राम आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्व मधुकरराव खंडारे यांच्या स्मृति प्रित्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार असून , प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी केले आहे, शैक्षणिक, साहित्य,कला, पत्रकारिता, युवा कार्यकर्ता, सामाजिक, चित्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनी पासपोर्ट फोटोसह आपला प्रस्ताव खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा, किंवा खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा, सदर प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोंबर आहे,
सचिन मधुकर खंडारे,
मुक्काम पोस्ट शिंदी, साखर खेर्डा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा पिन, 443202,
व्हाट्सअप नंबर 8657231119,
या पत्त्यावर आपला प्रस्ताव पाठवावेत,
सदर पुरस्कार हा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये वितरित केले जाणार आहे, पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे, आकर्षक ट्रॉफी मेडल, सन्मानपत्र, गुलाब पुष्प, शाल, फेटा, बॅच, असणार असून पात्र असलेल्यांनी प्रस्ताव पाठवावेत, सदर पाठवलेल्या प्रस्तावासाठी पाच समितीचे सदस्य निर्णय घेणार आहे,
अशी सुद्धा माहिती मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी दिली आहे .