धम्मदेशनेतून संस्कार मिळते संस्कारातून सुसंस्कृती मिळते म्हणून प्रत्येक विहारात संडे बुध्द धम्म स्कूल चालू करावी- भंते यश श्रीलंका

बुलढाणा,(बाबासाहेब जाधव)- चला तर हातात हात धरून धम्म दिशेला पदार्पण करूया,१९५६ नंतर अपूर्ण असलेला सदधम्म पूर्ण करण्यासाठी सकारात्मक तेचे एक पाऊल पुढे टाकूया….!!!
मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील मैत्रेय बुद्ध विहार समिती नागसेन नगर बुलढाणा यांच्या वतीने संडे बुध्द धम्म स्कूल दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रविवारला सकाळी 10 .00 वाजता पूजनीय भंतेजी यश श्रीलंका यांचे हस्ते महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोध्दिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप धुपाने पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले.
धम्मउपासक मैत्रीय बुध्द विहार समितीच्या वतीने भंते यश श्रीलंका यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संडे बुध्द धम्म स्कूलची संकल्पना मांडणारे समाजसेवक विजयजी वाकोडे यांनी प्रस्तावित करतांना विहारातील आजपर्यंत चालत आलेले धार्मिक इतर सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली व संडे स्कूल बद्दल सविस्तर विचार मांडले. पूजनीय भंतेंजी यश यांनी संडे बुध्द धम्म स्कूलला उपदेश करतांना म्हटले की, अशा ह्या स्कूल मधून सुसंस्कार मिळतील व या संस्कारातून सुसंस्कृती मिळेल व त्या सुसंस्कृतीतून सुसंस्कृत समाज निर्माण होईल व हा सुसंस्कृत समाज हा पुढील जगातील मानवांचा प्रज्ञा शिल करूणेचा आधारस्तंभ बनेल त्यासाठी प्रत्येक बुध्द विहारात आठवड्यातून एक दिवस संडे बुध्द स्कूल सुरू करून विहार हे ज्ञानाचे विद्यामंदिर बनावे तेव्हाच भारत बुध्दमय करण्याचे स्वप्न महामानव बोधिदिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण होईल व ते धम्मचक्र फिरे जगावरी या म्हणी प्रमाणे तेव्हा होईल असे मोलीक विचार भंते यश श्रीलंका यांनी यावेळी मांडले.
यावेळी बालगोपालांना तसेच लहान थोर महिला पुरुष यांना धम्मदेशना, त्रिसरण, पंचशील, देऊन संपूर्ण वातावरण बुद्धमय तथा धम्ममय करण्यात आले, धम्म शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकासह दोनशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून, सर्व विद्यार्थ्यांनी दर रविवारी उपस्थित राहण्याचा अतिशय आनंदाने व स्वइच्छेने आदरणीय भंतेजी समक्ष मानस व्यक्त केला आहे. पालकांना सुद्धा हा स्तुत्य उपक्रम फार मोलाचा असून, संपूर्ण मैत्रेय बुद्ध विहार समितीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. असेच अनेक सामाजिक उपक्रम या विहारात व्हावेत आणि होत राहतील असे समितीच्या वतीने ग्वाही देण्यात आली.
धम्मउपासक समाजसेवक दानदाते विजयजी वाकोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन आणि फल आहार देऊन पुण्य अर्जित केले.
एखादे निस्वार्थी निर्मळ सामाजिक कार्य होत असेल आणि निरागस बालकांचा पुण्य आशीर्वाद मिळत असेल तर दान दात्यांची रिघच रीघ लागत असते पण ते निःस्वार्थ असणे सर्वश्रुत आहे, म्हणून या निःस्वार्थी कार्यासाठी प्रत्येक रविवारी पुण्य अर्जित करणारे दानदात्यांची आजच नोंदणी सुद्धा झालेली आहे, प्राध्यापक नगराळे सरांनी तर उच्च प्रतीची कायम सुरूपी आसन व्यवस्था विहारास दान केली, एका प्राध्यापकानी नाव देता महत्त्वाची मौल्यवान वस्तू दान देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
एखादा साधा सरळ निर्मळ उद्देश असलेल्या विचारासाठी जर कार्य होत असेल तर नक्कीच दान दात्यांची रीघ लागते, हे यातून सिद्ध झाले आहे.
पुढील रविवारी यापेक्षा दुप्पट, तिप्पट संख्या होईल याची सर्वांना खात्री आहे व आली आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे विजय वाकोडे यांच्या कल्पनेतून विहाराच्यावतीने धम्म स्कूल सुरू व्हावी असा विचार होता यासाठी विहारातील सदस्यांनी व उपस्थितीतांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या अभिनव उपक्रमाला सामाजिक स्तरातून भरपूर प्रसिद्ध व सकारात्मक प्रतिसाद मिळाला, विहाराची स्वच्छता, रांगोळी, मंचावरील पुष्पहार व फुलरचना व्यवस्था महिला मंडळ यांनी चोखपणे बजावली, समितीचे अध्यक्ष बबनराव चव्हाण व सदस्य विजयजी वाकोडे यांनी विशेष परिश्रम घेतले, विशेष सहभाग प्रा. मोहोड सर, तायडे सर,जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, विशेष सहकार्य मिलिंद झिने,अवसरमोल साहेब, गजानन जाधव,मनोज वाकोडे,प्रमोद कंकाळ, डीआर इंगळे,प्रेम इंगळे,संजय कस्तुरे, विजय काळे,मिलिंद वानखेडे, यांच्याकडून मिळाले, उपक्रमाचे मनोगत विजय वाकडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.शरद नगराळे यांनी करून उपक्रमाची सांगता करण्यात आली. आणि संडे धम्म स्कूल ची कल्पना मांडून यशस्वी सुरू केली याबद्दल विजयजी वाकोडे याना भंते यश यांनी मंगलकामना आणि आशीर्वाद दिले.
यावेळी नागसेन नगर व बुलढाणा शहरातील बहुसंख्य बौद्ध उपासक,उपासीका उपस्थित होते.