भिलदरी येथे रानडुकरांचा धुमाकुळ शेतकऱ्यांचे मक्का पिक जमीनदोस्त

कन्नड/ किरण महेर तालुक्यातील भिलदरी येथील परीसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज दि. ३ रोजी वन विभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी भिलदरी येथे दाखल झाले वनरक्षक मोनाली फिरके वनमजूर रतन मगरे तसेच गावचे उपसरपंच विजय वैष्णव यांच्यासह शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मका पिकाचे झालेल्या नुकसानिची पाहणी करून पंचनामे करण्यात आले लागवडीपासूनच रानडुकरांनी शेतात घुसून पिकांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांना डबल पेरणी करावी लागली सध्या मका कापणीला आली असतानाच रानडुकरांनी मका आडवी पाडून जमीन दोस्त करुन मोठी हानी केली आहे आडवी पडलेली मका डुकरांच्या वासामुळे जनावरसुद्धा खात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे आणून बी-बियाणे घेतले मात्र आता ह्या झालेल्या नुकसानीमुळे त्याच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे दुकानदारांचे व सावकारांचे पैसे कसे फेडावेत, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी ह्या परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे
छत्रपती संभाजिनगर प्रतिनिधी किरन महेर