सामाजिक

श्री संत गजानन महाराज पालखीचे बिबी शहरात हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये जंगी स्वागत

बिबि / भागवत आटोळे सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात बिबी हद्दीमध्ये पालखीचे आगमन होताच फटाक्याचे
आतषबाजी, रांगोळी,पुष्पदृष्टी करत ‘श्री’ च्या पालखीचे व सोबत असणाऱ्या वारकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
श्री’ च्या पालखीसोबत ७०० वारकरी सहभागी आहे.’गण गण गणात बोते’ विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी व हजारो भक्त दंग होऊन गेल्याचे पाहायला मिळाले.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला मार्गस्थ होत असते,’श्री’ ची पालखी सध्या परतीच्या मार्गावर असून पालखीचे बिबी हद्दीमध्ये दुपारनंतर 5 वाजेच्या दरम्यान आगमन झाले.
यावेळी बिबी सह परिसरातील
विविध मान्यवर यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती.
दुसरबिड च्या हद्दीपासून शेकडो भाविक पायदळ बिबी शहरापर्यंत दिंडी सोबत दाखल झाले होते. ठिकठिकाणी श्री च्या पालखीचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले.
‘श्री’ च्या पालखीसोबत असणाऱ्या वारकऱ्यांची व भक्तांची भोजनाची व्यवस्था बीबी ग्रामस्थांनी केली होती,
सतत पडणाऱ्या पावसामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या वतीने वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली
वसंतराव नाईक कनिष्ठ महा विद्यालयांमध्ये पालखी मुक्कामासाठी थांबली होती.
वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये पालखीचे आगमन होताच परिसरातील हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप पाटील,पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे, नापोका अरुण सानप, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.ता.25 जुलै रोजी सकाळी ‘श्री’ ची पालखी किनगाव जटटू मार्गे लोणार साठी प्रस्थान करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button