बुलडाणा आगाराचे कर्तव्यदक्ष चालक आशोक वानखडे यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा

बुलढाणा,(प्रतिनिधी)-
बुलढाणा आगारातून नियत वयोमानानुसार 19 वर्षे सुरक्षित विनाअपघात चालक या पदावर 2006 साली राप महामंडळात यवतमाळ विभागात उमरेड आगारात चालक या पदावर रूजू झालेले तीन वर्षे उमरेड आगारात चालक पदावर कामगीरी केली व नंतर 2009 साली बुलडाणा विभागातील बुलडाणा आगारात रूजू झाले आणि आज 30 जून 2025 रोजी रापची सेवा करून वयोमानानुसार शासनाच्या नियमानुसार 19 वर्षे सेवा देवून ते सेवानिवृत्त झालेले कर्तव्यदक्ष आज्ञाधारक प्रवासी सेवा हीच समाजसेवा, “ बहुजन हिताय बहुजन सुखाय “ हे सेवेचे व्रत डोळ्यांसमोर ठेऊन एसटी ही आई अन्नदाती म्हणून तीची मनोभावे सेवा करणारे एसटीची कामगिरी पहीली नंतर इतर कामे एसटीच्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे आदर्श सेवानिवृत्त चालक आशोक मारोती वानखडे हे बुलडाणा आगारातून चालक या पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा 30 जून रोजी बुलढाणा आगाराच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सकाळी बुलडाणा आगारात करण्यात आला व नंतर संध्याकाळी व्दारका हॅाटेल मलकापूर रोड बुलढाणा येथे त्यांच्या मित्र परिवाराने सेवानिवृत्तीचा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलडाणा आगाराचे डेपो मॅनेजर आमोल गडलींग होते. प्रमुख उपस्थिती मध्ये रिपाई आठवले गटाचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, बुलढाणा स्थानक प्रमुख कृष्णा पवार, ईपीएस 95 चे जिल्हा समन्वयक तथा निळे वादळ या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशोक दाभाडे, राप कार्यशाळा अधिक्षक रमेश आराख, विभागीय वाहतूक अधिकारी दिपक साळवे, वाहतूक अधिक्षक चंद्रकांत झिने, कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे आमरावती प्रदेशाध्यक्ष जीवन जाधव, वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर,ईपीएस 95 चे राष्ट्रीय सल्लागार सोशलमिडीया प्रमुख विलास पाटील, ईपीएस 95 च्या राष्ट्रीय महीला समन्वयक नारखडे ताई, ईपीएस 95 चे कोषाध्यक्ष नारखेडे दादा, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जिप बुलडाणा विमल जाधव होते.
सर्वप्रथम भगवान गौतम बुध्द व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप धुप पुष्पाने मान्यवरांनी पुजन केले नंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचकावरील मान्यवराच्या हस्ते “ भारतीय संविधान व शाल पुष्प गुच्छ “ देवुन त्या सत्कार मुर्ती सेवानिवृत्ती चालक आशोक वानखडे व त्यांच्या पुर्णींगीनी यांचा सन्मान करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला.
चालक आशोक वानखडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे राज्यपरिवहन महामंडळातील सर्व संघटना, नातेवाईक मित्रपरिवार राप कर्मचाऱ्यांनी शाल, श्रीफळ, कपडे,भेट वस्तू देऊन त्यांच्या दीर्घकालीन सेवेचा सन्मान करण्यात आला.
आगार व्यवस्थापक आमोल गडलींग यांनी आपल्या मनोगतातून, निवृत्त होणारे चालक आशोक वानखडे यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेस सलाम करत, त्यांच्या कुटुंबीयांचेही विशेष कौतुक केले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, एसटीची सेवा ही समाजसेवा आहे अत्यंत हुशारी व जबाबदारीची आहे. वर्षानुवर्षे कर्तव्य पार पाडत अनेक संकटांना तोंड देत राप कर्मचाऱ्यांना त्यातल्या त्यात एसटीचा कणा हा चालक,वाहक, म्याक्यानिक असतो आपण सर्वांनी समाजातील प्रवाशांची सुरक्षित सुव्यवस्थेसाठी सेवा करण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावीत आहे.
आशोक वानखडे हे कर्तव्यदक्ष आज्ञाधारक एसटीच्या कामाला प्रथम प्राधान्य देणारे कोणतीही कामगिरी दिली ती आनंदाने पूर्ण करणारे एसटी ही आपली आई अन्नदाती आहे तीची सेवा करा ती आपल्या कुटुंबाला व आपल्याला मेवा देईल म्हणून तीचे प्रमाणीक पणे सेवा करा प्रवासी सेवा हीच समाजसेवा आहे, “बहुजन हिताय बहुजन सुखाय “ हे ब्रीद वाक्य घेऊन वागणारे आशोक वानखडे हे आज सेवानिवृत्त होत आहे पण त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा व एसटीच्या प्रगतीपथाकडे सर्व राप कर्मचाऱ्यांनी मन ओतून काम करावे एसटीच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यावे असे आव्हान यावेळी आगार व्यवस्थापक आमोल गडलींग यांनी उपस्थितांना केले व आशोक वानखडे यांना सेवानिवृत्ती नंतरच्या भावीवाटचालीस निरोगी दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव भारत आराख, बुलडाणा विभागीयध्यक्ष दिपक मिसाळकर, रवि आवसमोल, जीतेंद्र साळवे, कामगार सेनेचे सोनु बावस्कर, गजानन माने,संजय उबरहंडे, समाधान जुमडे,एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र पवार, संतोष बावस्कर,साहेबराव किन्नर,सचिन शेळके, दिपक निकम, मंगेश ढोण,स्वप्निल पाटील, सचिन खिर्डेकर, बहुजन कर्मचारी संघटनेचे सोहन भालेराव, देविदास अंभोरे, रत्नदिप हिवाळे, कास्ट्राईबच् आत्माराम चौतमोल,पद्माकर डोंगरे, गणेश झोटे, प्रल्हाद कांबळे, लक्ष्मी बंड डोंगरदिवे, प्रताप वानखडे चिखली कास्ट्राईचे डेपो सचिव , जोती खरे, प्रतिभा वानखडे, विद्या महाले, जाधव ताई, माधुरी सुरडकर, महावीर काळे, के.व्ही. प्रधान, अब्दुल लतीफ,विशाल राऊत,अब्दुल वाहाप बुलडाणा विभागातील कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी,कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित असल्याने तो क्षण एक गौरवमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी निवृत्त अधिकारी व मंचकावरील मान्यवरांनी आशोक वानखडे यांच्या वागणूकीच्या जीवन शैलीवर व कामगीरीवर आपल्या भावना व्यक्त केल्या रापचे आप-आपले अनुभव व्यक्त करीत काहींनी डोळ्यातून अश्रू अनावर करत राप कर्मचाऱ्यांच्या कर्याची कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर स्नेहसंमेलनाचा क्षण ठरला, जिथे अनुभव, सन्मान व स्नेह या तिन्हींचा मिलाफ पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ईपीएस 95 चे जिल्हा सचिव पी.आर. गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त वाहक भिवा वाघ यांनी केले या कार्यक्रमाला बहुसंख्य राप कर्मचारी अधिकारी तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा चाहता वर्ग व नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.