वेणी तालुका लोणार घटनेचा देऊळगावराजा येथे निषेध !

देऊळगावराजा : देवानंद झोटे
लोणार तालुक्यातील जातीवादी गावगुंडांनी वेणी तालुका लोणार येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची जागा नियोजित असताना त्यातील निळा ध्वज व कंपाऊड उखडून फेकले व एवढेच न करता वेणी येथील बौद्ध कुटुंबाना अमानुष मारहाण केली व दोन समाजात झालेला वादिवाद मिटवण्यासाठी पी.री.पा .चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ सावळे गावात वाद मिटवण्यासाठी येत असताना वेणी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर त्यांच्यावर जातीय वादी 6 ते 7 गावगुंडांनी त्यांच्या वर हल्ला केला या वरील घटनेचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देऊळगावराजा येथील सर्व आंबेडकरी जनतेने केले असून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे .
निवेदन देते वेळेस पिरिपा चे विदर्भ उपाध्यक्ष गौतम कासारे ,राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रा दिलीप झोटे शिवसेनेचे आकाश साळवे ,राहुल हिवाळे ,पिरिपाचे युवक जिल्हा अध्यक्ष विकास कासारे पी .डी .म्हस्के सर नाथा काकडे प्रकाश काकडे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष शरद खरात यांची उपस्थिती होती .