विद्युत शॉकने घेतला १३ वर्षांच्या समृद्धीचा निरागस जीव!
विद्युत शॉकने घेतला १३ वर्षांच्या समृद्धीचा निरागस जीव!
पाणी भरताना लागला विजेचा झटका; गावात पसरली शोककळा, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर!
सिंदखेडराजा/प्रतिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ
गावातील मन हेलावून टाकणारी एक हृदयद्रावक घटना निमगाव वायाळ येथे आज दिनांक ३ जुलै रोजी सकाळी घडली. केवळ १३ वर्षांची समृद्धी गैबीनाथ वायाळ, ही इयत्ता सातवीची विद्यार्थीनी, घरासमोर असलेल्या नळावर पाणी भरताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली आणि जागीच कोसळली. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत.
दररोजप्रमाणे आज सकाळी समृद्धी शाळेसाठी तयारी करत होती. घरातील रोजचे काम म्हणून ती पाणी भरायला घरासमोरील नळावर गेली. मात्र तिथेच तिचा मृत्यूच्या कवेत जाण्याचा क्षण दडलेला होता. अचानकच विजेचा तीव्र शॉक लागल्याने ती नळाजवळच कोसळली. या घटनेमुळे आजोबा आणि शेजारी घाबरून तिला उचलून किनगाव राजा येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून “आता उशीर झाला” असे सांगत तिला मृत घोषित केले.
अभ्यासात हुशार, सर्वांची लाडकी
समृद्धी ही हिवरखेड पूर्णा येथील विजय मखमले महाविद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती. ती अभ्यासात अतिशय हुशार, शांत आणि समजूतदार स्वभावाची विद्यार्थिनी होती. शाळेतील शिक्षक, वर्गमित्र आणि गावकऱ्यांमध्ये तिची चांगली ओळख होती. खेळात, उपक्रमांमध्येही ती नेहमी अग्रेसर असायची.
समृद्धीच्या अचानक निधनाने संपूर्ण निमगाव वायाळ गाव व परीसर सुन्न झाला आहे. शाळा परिसरातही दुःखाचे वातावरण आहे. गावकरी, शिक्षक, आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने वायाळ कुटुंबीयांच्या घरी धाव घेऊन अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
अभ्यासू, शिस्तप्रिय आणि सर्वांना आपली वाटणारी समृद्धी… बद्दल
शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला दु:खद लोकभावना