संतोष देशमुख यांना अनंतराव भालेराव पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी पत्रकारीतेतील उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक दिव्य मराठीचे सीनियर रिपोर्टर संतोष देशमुख यांना शासनाचा अनंतराव भालेराव पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019, 2020, २०२१,
२०२२ व २०२३ वर्षांसाठीचे पत्रकारिता पुरस्कार २४ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत.
गत २००५ पासून संतोष देशमुख पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तर दिव्य मराठीत 2011 पासून काम करत आहेत. कृषी, सहकार, परिवहन, जिल्हा परिषद, बाजारपेठ, वन, वन्यजीव, हवामान, पर्यावरण, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, ऊर्जा, नगरी समस्या, रियल इस्टेट, आयटी, जीएसटी आदी विषयांवर शोध पत्रकारिता,
सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. शेती विषयावर पुस्तक लिखाण देखील केले आहे. याच पत्रकारितेतील बहुयामी उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कृषी व फलोत्पादन विभागाच्या वतीने २०१६ मध्ये वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते आणि छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसईया उईके यांच्या हस्ते राजरत्न पुरस्कार, आविष्कार फाउंडेश कोल्हापुरच्या वतीने राज्यस्तरीय बाळशास्री जांभेकर स्मृती पुरस्कार, चौथा स्तंभ पुरस्कार, मराठावाडास्तरीय उत्कृष्ट पुरस्कार, आदी पुरस्कारांनी
सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा अतिशय मानाचा अनंतराव भालेराव पुरस्कारासाठी संतोष देशमुख यांची निवड झाली आहे. यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मानचिन्ह, प्रशिस्तपत्र आणि ५१ हजार रुपये रोख असे पुरस्कारचे स्वरूप असून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.