Uncategorized

सपना इंगळे साता समुद्रापार; अंढेरा गावातून थेट दुबईच्या व्यासपीठावर झेप!

देऊळगाव राजा/ देवानंद झोटे देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा या गावात आज मोठा अभिमानाचा क्षण अनुभवला गेला! आंबेडकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते मनोज इंगळे सुशीला मनोज इंगळे यांची कन्या सपना इंगळे ही दुबई येथे नोकरीसाठी रवाना झाली आहे. शिक्षणाचा ध्यास, संघर्षाची शिदोरी आणि वडिलांच्या आशीर्वादाने तिने आपली वाट चालत सपनेचं स्वप्न साकारलं आहे.

“माझी मुलगी शिकून मोठ्या पदावर जावी,” अशी मनोज इंगळे यांची इच्छा होती. आज सपना दुबईच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या ज्ञान, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर झेप घेत आहे, आणि आपल्या वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.

औरंगाबाद विमानतळावरून ती आज मुंबईमार्गे दुबईकडे रवाना झाली. तिच्या या नव्या प्रवासासाठी संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि गावकरी भावनिक झाले.
सपना इंगळे हिने सर्वांना आभार मानत म्हटलं, “ही सुरुवात आहे… आणि मी ही संधी फक्त माझ्या आई-वडिलांमुळे मिळवू शकले. त्यांच्या कष्टांना वंदन.”


ही केवळ एका मुलीची यशोगाथा नाही…
ही आहे एका विचारसरणीची, एका चळवळीची आणि एका बापाच्या स्वप्नांची यशस्वी उधळण!

सपना इंगळे हिला पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
तू झेप घेत राहा… अंधेर्‍यातून उजेडाकडे! 🌍✨

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button