Uncategorized

५०० रुपयांचा खर्च संपला! विद्यार्थ्यांना आणि सामान्यांना मोठा दिलासा; प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द!

मुंबई (प्रतिनिधी)
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक ओझे हलवणारा ऐतिहासिक निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत जाहीर केला.
आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व सर्टिफिकेट यांसह सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणाऱ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा मोठा आर्थिक खर्च टळणार आहे. पूर्वी प्रत्येक अर्जासाठी ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर घेणे आवश्यक होते, मात्र आता केवळ साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्ज करूनही संबंधित दाखले मिळू शकणार आहेत.

दरवर्षी दहावी, बारावीच्या निकालानंतर लाखो विद्यार्थी विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात धाव घेतात. अशा वेळी स्टॅम्प पेपरचा खर्च, नोटरीचे शुल्क आणि अतिरिक्त वडीलधाऱ्यांची धावपळ ही मोठी डोकेदुखी ठरत होती.
मात्र या निर्णयामुळे ती अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असून, राज्यभरातील महसूल कार्यालये लवकरच नवीन प्रक्रियेनुसार कामकाज सुरू करणार आहेत.

दरम्यान, राज्यभरातून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, “हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी दाखवणारे पाऊल आहे,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

एकाच निर्णयात, शिक्षण, प्रशासन आणि सामान्य माणसाच्या जगण्याला दिलासा देणारे ऐतिहासिक पाऊल!
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या या निर्णयाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button