सामाजिक

बुलढाणा जिल्हा पर्यटन सचिव जनार्दन चित्तेकर यांचा धम्मसेवेचा उज्ज्वल वसा! जनार्दन चित्तेकर यांचा स्तुत्य संकल्प — ज्या विहारात “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ नाही, तिथे स्वतः जाऊन ग्रंथ दान!

बुलढाणा जिल्हा पर्यटन सचिव जनार्दन चित्तेकर यांचा धम्मसेवेचा उज्ज्वल वसा!

जनार्दन चित्तेकर यांचा स्तुत्य संकल्प — ज्या विहारात “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ नाही, तिथे स्वतः जाऊन ग्रंथ दान!**

सिंदखेडराजा / प्रतिनिधी
धम्माचं ज्ञान ज्या बुद्ध विहारात पोहोचलेलं नाही, तिथे स्वतः जाऊन “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा पवित्र ग्रंथ पोहोचवण्याची धम्मनिष्ठ मोहिम सुरू केली आहे ती असोला जहागीरचे सरपंच आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदखेड राजा चे समता सैनिक डिव्हिजन ऑफिसर तसेच जिल्हा पर्यटन सचिव जनार्दन चित्तेकर यांनी!

धम्म विचारांचा प्रकाश प्रत्येक बुद्ध विहारात पोहोचावा, समाज प्रबोधन व जागृती व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी एक आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील ज्या गावांमध्ये अजूनही “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथ उपलब्ध नाही, अशा विहारांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन ग्रंथाचे दान केले जात आहे.

या अभियानांतर्गत सम्राट नगर सिंदखेडराजा, धानोरा, वर्दडी बु., अंतरवाडी, हनवत खेड, मंगरूळ, जेतवन बुद्ध विहार, जिजामाता नगर सिंदखेडराजा आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन ग्रंथाचे वाटप केले आहे. धम्म विचारांचा हा अमूल्य ग्रंथ समाजाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा, हीच त्यांच्या कार्यामागची प्रेरणा आहे.

आजच्या स्पर्धेच्या आणि अज्ञानाच्या युगात, समाजाला विचारांचा दिवा दाखवणारे आणि धम्म शिकवणं घरोघरी पोहोचवणारे असे जनार्दन चित्तेकर यांचे कार्य खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

🔸 ग्रंथ पाहिजे असलेल्या व्यक्तींनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 9764641898
📞 9921320761

— बुलढाणा जिल्हा पर्यटन सचिव जनार्दन चित्तेकर यांचा धम्मसेवेचा उज्ज्वल वसा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button