अंढेरा पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून जुगार अड्डा! – गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, अंढेरा पोलीस मात्र गप्प!

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 जुलै 2025 रोजी भरोसा शिवारात धाड टाकून सुरू असलेल्या वरली मटका व एक्का बादशाह या जुगार खेळांवर मोठी कारवाई करत तीन जुगार्यांना रंगेहाथ पकडले असून ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. ही कारवाई अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच पार पडली, पण स्थानिक पोलिसांना याची साधी कल्पनाही नव्हती!
या घटनेने अंढेरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, “अंधारात कोण?” हा सवाल गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
स्थानिक पोलीस झोपी की हातमिळवणी?
अंढेरा पोलीस ठाण्याच्या डोळ्यादेखत सुरू असलेला जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेला माहिती होता, पण अंढेरा पोलिसांना का नाही? हा सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत. पोलीस ठाण्याच्या नाकावर हे सगळं सुरू असताना त्यांना कानोकान खबर कशी नव्हती?
एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी लपूनछपून कारवाई करतात, तर दुसरीकडे अंढेरा पोलीस मात्र गप्प आणि बिनधास्त!
गावकऱ्यांमध्ये संताप – “पोलीसच आंधळे?”
या कारवाईनंतर गावकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी पोलीस यंत्रणेशी हातमिळवणी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सतत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी बुलढाणा शहरातून पथक येतं, हेच दर्शवतं की स्थानिक पोलीस निष्क्रिय होते की जाणूनबुजून दुर्लक्ष करत होते?
कारवाई करणारे पोलीस अधिकारी- HC गजानन दराडे,HC जगदेव टेकाळे,HC दिगंबर कपाटे
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप. पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले, तर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या सूचनेवरून कारवाई करण्यात आली असून तीन आरोपी ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहे.