Uncategorizedसामाजिक

ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा – आक्रमक पॅंथर प्रल्हादभाई कोलते

बुलढाणा/ रामदास कहाळे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दिपक भाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, विदर्भ संपर्क प्रमुख संकेत भाई जाधव यांच्या आदेशावरून, बुलढाणा जिल्हा प्रभारी अमोल भाई शेगोकार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय भाई वानखेडे, बुलढाणा जिल्हा सचिव प्रशांत भाई तायडे यांच्या सुचनेनुसार आज दि.16/07/2025 रोजी पॅंथर प्रल्हादभाई कोलते बुलढाणा जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांना निवेदन सादर करण्यात आले की, मोताळा तालुक्यातील रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास या योजनेमधील लाभार्थ्यांच्या हप्त्याची अडवणुक करून 5000, अक्षरी पाच हजार रुपयाची मागणी संबंधित विभागाचे इंजिनिअर हे खाजगी एजंट मार्फत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामार्फत पैशाची मागणी करत आहेत.तसेच ते लाभार्थी एजंट मार्फत इंजिनिअर 5000, अक्षरी पाच हजार रुपये यांना देतील अशा लाभार्थी कागदपत्रांमध्ये ऍडजेस्टमेंट करून घेऊ असे इंजिनियर आणि त्यांचे एजंट लाभार्थ्यांना सांगत आहे तसेच ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे बरोबर असताना देखील अशा लाभार्थ्यांची अडवणूक करून पैशांची मागणी केली जात आहे तसेच दरवेळेस हप्ता टाकताना त्यांना प्रत्येकी हप्ता हजार रुपयाची मागणी त्यांच्या एजंट मार्फत करण्यात येत आहे. तरी गट विकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या इंजिनियर यांची चौकशी करून लाभार्थ्यांची होणारी लूट थांबवावी ही नम्र विनंती आहे असे न केल्यास लोकशाही मार्गाने शीर व स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील . अशा प्रकारचा इशारा असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हा महासचिव प्रल्हाद भाई कोलते, शहराध्यक्ष शफिक भाई सय्यद, मोताळा तालुका अध्यक्ष भाऊजी कोलते, मोताळा शहर उपाध्यक्ष बिरजू चव्हाण, मोताळा तालुका सचिव भीमराव गरुडे, तालुका संघटक कृष्णा गरुडे, तालुका कार्याध्यक्ष क्रिश अहिरे, तालुका महासचिव शुभम कठाडे, तालुका महासचिव, नितीन भाई इंगळे, असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button