वामनदादाचे नाव,जगाला विसरु देणार नाही:-शाहीर डी आर इंगळे

बुलडाणा/, प्रतिनिधी वामनदादाच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला लाभले, त्या माध्यमातून कविता, गाणे व चळवळ समजली. माझ्यातला अभिनिवेश दूर करून वामनदादांनी माझ्यासारख्याला प्रबोधन परंपरेत आणले. आज आयुष्याच्या प्रांतात जो काय मी आहे तो फक्त दादा मुळे च आहे.माझ्या सारख्या बिन चेहऱ्याच्या व्यक्तीचा चेहरा मोहरा बदलला त्याला केवळ वामनदादांचा वैचारिक स्पर्श कारणीभूत ठरला आहे.त्यामुळे दादांचं नाव आम्ही जगाला विसरु देणार नाही असे भावनिक उद्गार शाहीर इंगळे यांनी याप्रसंगी काढले.
सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंती निमित्ताने दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दुसरबीड येथील गीतांजली लॉन्स येथे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सहवासात राहिलेले महाराष्ट्र शासनाचा शाहिरी पुरस्कार विजेते शाहीर डी आर इंगळे यांचे हस्ते पार पडले,या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रा संजयजी खडसे उपविभागीय अधिकारी सी राजा हे होते.या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.या प्रसंगी लोककवी,वामनदादा कर्डक यांना 103 वी जयंतीच्या निमित्ताने अनेक शाहिरांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून दादांना आदरांजली वाहिली. आज सकाळपासूनच प्रचंड पाऊस असताना सुद्धा सतत पाच तास चाललेल्या या कार्यक्रमातुन रसिक,श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. जोरात बरसत असून सुद्धा अनेक कलाकारांनी वामनदादा च्या जयंती साठी पावसाची परवा न करता मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलडाणा चौफेरेचे मुख्य संपादक गंगाराम उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त लोकशाहीर भीमरावजी थोरवे यांनी केले.