शाहिरांचा विचार जपला तरच इतिहास जिवंत राहील:- प्रवीण गीते

बुलडाणा / प्रतिनिधी या देशांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी बरोबरच अनेक चळवळींचे स्पुल्लिंग पेटवण्याचे काम इथल्या शाहीर,कवी,गायक यांनी केले आहे. सामान्य माणसांच्या धमन्यांमधील रक्त तापवण्याचे काम शाहीरानी केले आहे.आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीपासून तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत व अनेक शेतकरी चळवळी उभ्या करण्याचे काम शाहीरांच्या माध्यमातून झाले असल्याने, शाहिरांचा विचार जिवंत ठेवण्याचे काम जर आम्ही करू शकलो तरच इथला इतिहास जिवंत राहणार आहे असे मौलिक उद्गार लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते यांनी याप्रसंगी काढले, ते पुढे बोलताना म्हणाले की, लोककवी वामनदादा कर्डक या परंपरेतील कोहिनूर आहे. दादांनी त्यांच्या हयातीत हजारो गाणे लिहिली, त्यातून सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया निर्माण झाली. दादांच्या गाण्यांनी चळवळीला बळ दिले हे अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे काम महाकवी वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या आयुष्यात केल.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंती निमित्ताने दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दुसरबीड येथील गीतांजली लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सहवासात राहिलेले महाराष्ट्र शासनाचा शाहिरी पुरस्कार विजेते शाहीर डी आर इंगळे यांचे हस्ते पार पडले,या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी लोकजागर परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण गीते हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रा संजयजी खडसे उपविभागीय अधिकारी सी राजा हे होते.या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.या प्रसंगी लोककवी,वामनदादा कर्डक यांना 103 वी जयंतीच्या निमित्ताने अनेक शाहिरांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून दादांना आदरांजली वाहिली. आज सकाळपासूनच प्रचंड पाऊस असताना सुद्धा सतत पाच तास चाललेल्या या कार्यक्रमातुन रसिक,श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. जोरात बरसत असून सुद्धा अनेक कलाकारांनी वामनदादा च्या जयंती साठी पावसाची परवा न करता मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मुंबईवरून आलेल्या गायिका मंदाताई वाघमारे यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून वामनदादा काय होते हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आयोजकाने वाघमारे ताईचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलडाणा चौफेरेचे मुख्य संपादक गंगाराम उबाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त लोकशाहीर भीमरावजी थोरवे यांनी केले.