सामाजिक

शेतकरी नेत्यावर हल्ला – अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणचा खाक्या बाहेर! छावा संघटनेचा संतप्त एल्गार – हल्लेखोरांवर 307 लावाच, अन्यथा रस्त्यावर पेटू!”

सिंदखेड राजा/ प्रतिनिधी राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना आणि रोज शेतकरी आत्महत्या करत असताना, सरकार मात्र केवळ खुर्च्या वाचवण्यात गुंतले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचा आवाज बनलेले आणि छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजयभैया घाडगे पाटील यांच्यावर लातूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते सूरज चव्हाण याने गुंडांबरोबर मिळून जीवघेणा हल्ला केला.
हा हल्ला केवळ एका कार्यकर्त्यावर नाही, तर तो लोकशाहीवर, संविधानावर आणि महाराष्ट्राच्या शेतकरी संस्कृतीवर झालेला हल्ला आहे!

राज्य सरकारमधील मंत्र्यांचा हा माज आता जनतेच्या लक्षात येतोय!
एकीकडे पिक विमा नाही, आत्महत्या थांबवण्याची योजना नाही, आणि दुसरीकडे निषेध करणाऱ्या शेतकरी नेत्यावर मारहाण? ही कोणती लोकशाही?

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव यांनी थेट सिंदखेडराजा येथून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन पाठवून सूरज चव्हाण व गुंडांवर IPC 307 – खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सत्तेच्या आडोशाने गुंडगिरी करणाऱ्या सूरज चव्हाणचा खाक्या आता महाराष्ट्र पाहतोय.
अजितदादा पवार यांच्या गटाचे हे प्रस्थ जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारे आणि विरोधाचा आवाज चिरडणारे ठरत आहेत.

“गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर छावा संघटना आक्रमक आंदोलन करणार” असा इशारा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला आहे
सत्तेची ताकद वापरून लोकशाहीला मुठीत घेण्याचा प्रयत्न सूरज चव्हाणसारखे नेते करत असतील, तर छावा संघटना थांबणार नाही – झुंजेल, लढेल, आणि अन्याय करणाऱ्यांना उघडे पाडेल!यावेळी मा. अशोकराव परसराम जाधव – जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय छावा संघटना, बाळासाहेब शेळके ,कृष्णा कुहिरे पाटील, श्री. राजेंद्र आढाव
धी. शिवाजी गव्हाड – जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड श्री. रामदास चौधरी, श्री. संजय उगले संजय जाधव,श्री. लक्ष्मणराव कठोरे, दीपक राजे ,संदिप देशमुख,निलेश देवरे,शिवा दादा पुरंदरे,सतीश देशमुख,अतिश राजे जाधव यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button