लोककवी वामनदादांच्या गीताच्या मैफिलीला बुलढाणा करांचा प्रचंड प्रतिसाद….

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 103 जयंतीच्या निमित्ताने लोकराजा शाहू फाउंडेशन व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा यांच्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून बुलढाणा शहरांमध्ये लोककवी वामनदादांच्या गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा 24 ऑगस्ट 2025 रोजी गोवर्धन सभागृहामध्ये या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी केले तर अध्यक्षस्थानी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष समाजभूषण दादासाहेब काटकर हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दामोदर बिडवे, आयुर्वेदतज्ञ प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, वत्सलाबाई जनार्धन गवई, मंगल गोपीनाथ मिसाळ, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ,डिआर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाकवी वामनदादांचा सहवास हा बुलढाणा आणि परिसराला लाभला आहे असंख्य गीतांच्या रचना वामनदादांनी या बुलढाणा भूमीतच केले आहे त्यामुळे त्यांना दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहिले जाते. यावर्षी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे सपना खरात व चेतन चोपडे यांनी वामनदादांनी लिहिलेल्या लोकगीते शेतकरी गीते व बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
वंदन माणसाला हे कायेचे
अन मायेचे चंदन माणसाला
गायक चेतन चोपडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
गायक अजय देहाडे यांनी गायलेल्या
झेंडा निला वतन का
पैदा हुवा महू मे
या गीताला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
सपना खरात यांनी
माळावरची माती बोले
आज मळ्याच्या मातीला
फुगवू नको तू गर्वाने
फुगवू नको त्या छातीला
हे वामनदादांचे लोकगीत गायले.
कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बुलडाणा शहराचे युवानेते कुणाल पैठणकर यांनी तर प्रास्ताविक प्रा.डी.आर. माळी यांनी केले आभार प्रदर्शन सामाजिक प्रबोधनकार प्रा. राजेश खंडेराव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल पैठणकर
प्रा.डी.आर.माळी, प्रा. राजेश खंडेराव,विधीतज्ञ ॲड.राहुल दाभाडे, बौध्दमहासभेचे सुरेश डवरे, आत्माराम चौतमौल,राजेश टारपे, गणेश झोटे, मोनिका साळवे, सारिका घेवंदे, सुरेश सरकटे, बीआर मेढे,पत्रकार संजय जाधव, प्रा. प्रदीप जाधव, सुरेश घेवंदे, आदर्श शिक्षक प्रशांत बोर्डे, पंजाबराव निकाळजे, संजय खांडवे, पद्माकर डोंगरे, प्रल्हाद कांबळे, सिद्धार्थ आराख, विनोद फकीरा इंगळे, रवींद्र जाधव व लोकराजा शाहू फाउंडेशन ,दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.