सेवेतून समाधान’ उपक्रमात श्री. जे. एन. वाघ यांचा पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते गौरव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तिपत्र देऊन सत्कार!

बुलढाणा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ‘महसूल दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या दिवशी ‘सेवेतून समाधान’ या विशेष उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा पातळीवर गौरवण्यात आले.
यावेळी श्री. जे. एन. वाघ, महसूल सहाय्यक, यांना त्यांच्या अतुलनीय व प्रामाणिक सेवेसाठी प्रशस्तिपत्र देऊन पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
2024-25 या कालावधीत महसूल प्रशासनात त्यांनी दाखवलेली तत्परता, कार्यकुशलता आणि जनतेच्या सेवेसाठी दिलेला झोकून प्रयत्न यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
प्रशस्तिपत्र देताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी श्री. वाघ यांचे अभिनंदन करत म्हणाले की, “अशा कर्मचाऱ्यांमुळेच महसूल प्रशासनाची विश्वासार्हता अधिक बळकट होते!”
महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांसाठीही हा गौरव प्रेरणादायी ठरणार असून, ‘सेवेतून समाधान’ या धोरणाला अधिक बळकटी मिळाली आहे. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव सोहळा जल्लोषात पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे व जिल्हाधिकारी किरण पाटील इतर अधिकारी उपस्थित होते