बिबी गावात राजकीय भूकंपमाजी सरपंच गजानन काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) मध्ये धडाकेबाज प्रवेश — लोणारमध्ये शक्तिप्रदर्शनाने झाली जोरदार एंट्री!

लोणार / भागवत आटोळे
राजकारणात नवे वळण घेणाऱ्या बीबी गावात एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. बीबी येथील माजी सरपंच गजानन काकडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश करून स्थानिक राजकारणाला नवा वेग दिला आहे. 1 ऑगस्ट रोजी लोणार येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा ऐतिहासिक प्रवेश पार पडला.
या प्रवेश सोहळ्यात सिंदखेडराजा मतदारसंघाचे लाडके आमदार मा. मनोजभाऊ कायंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गजानन काकडे यांनी पक्षात प्रवेश करताच उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मकरंद पाटील साहेब, बीबी येथील जेष्ठ नेते पाटील बुवा, आंधळे, तुळशीराम करपे आदींची विशेष उपस्थिती होती.
या शक्तिप्रदर्शनात काकडे यांच्यासोबत अनेक मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये खास उल्लेखनीय नावे म्हणजे –
विठ्ठल आटोळे (माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष, बीबी)
प्रा. अरविंद चव्हाण
सुनील केंद्रे
ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देवकर
गोर सेना जिल्हाध्यक्ष वितेश चव्हाण
माजी सरपंच, हिवरा खंड
माजी सदस्य कैलास मुळे
अंबादास पाटील खंड
अजित सानप, गजानन मुतरकर, सुनील मुंडे, नरसिंग चौधरी आदींनी आपली हजेरी लावली.
गजानन काकडे यांचा प्रवेश म्हणजे बीबीच्या राजकारणात शक्तिशाली पाऊल असून, येत्या काळात या निर्णयाचे परिणाम गावाच्या राजकीय समीकरणांवर निश्चितच दिसून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
युवा वर्गात आणि गावा-गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रवेश सोहळा एक राजकीय मेळावा ठरला.
आता बीबी गावात नवा जोश, नवी दिशा आणि नव्या नेतृत्वाच्या आशेची हवा निर्माण झाली आहे!
लोणार / भागवत आटोळे