सामाजिक
अंशकालीन परिचारिकांना जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून मिळणार गणवेश….!

- बुलढाणा/ राजू भालेराव अंशकालीन महिला परिचर संघटना ही नुकतीच सीटूच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवून सीटू मध्ये विलीन करण्यात आली.त्यांचे बेमुदत आंदोलन मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू आहे.या आंदोलनाच्या निमित्ताने मानधन वाढ, किमान वेतन, आरोग्य विमा,भाऊबीज भेट आणि गणवेश मिळावा इत्यादी मागण्यांचे निवेदन १९ ऑगस्ट रोजी सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.खरात साहेब यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले.यावेळी सीटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, संघटनेच्या अध्यक्ष कुशीवर्ता मगर, सचिव शारदा खंडेराव,छाया खंडारे आणि नर्मदा शिरसाट इत्यादीनी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गुलाबराव खरात साहेब यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून अंशकालीन परिचारिकांना गणवेश व भाऊबीज मिळावी यासाठी विनंती केली.मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी परिचारिकांना यावर्षी गणवेश देण्याचे मान्य करून इतर मागण्यासाठीचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच या आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी मा.अमोल गीते यांना सूद्धा देण्यात आले .या आंदोलनात जिल्ह्यात परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.