नवरंग गणेश मंडळात मानकरींचा सन्मान – भक्तिमय वातावरणात झाली महाआरती”

बिबी (भागवत आटोळे)गणेशोत्सवाच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरंग गणेश मंडळाच्या वतीने आरती मानकरींचे भावपूर्ण स्वागत करून त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली. आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुवर्णशिला ज्वेलर्सचे संचालक किशोरभाऊ निंबेकर व परिवार तसेच पत्रकार भागवत आटोळे यांचा परिवार या दोन्ही मानकरी परिवारांचा मंडळात सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी गणपती बाप्पाच्या आरतीदरम्यान गावभर भक्तिमय वातावरण दुमदुमले. भजनी मंडळींच्या गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि मंडळाच्या सदस्यांच्या उत्साही उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. मानकरी परिवारांनी गणरायाचे आशीर्वाद घेत गणेशभक्तांना सद्भावना व मंगलमय शुभेच्छा दिल्या.
गावकरी व गणेशभक्तांनीही या सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्तिभाव, संस्कार व आनंदाच्या लहरींनी संपूर्ण गणेश मंडळ दुमदुमून गेले.