दीक्षाभूमी ते चैत्यभूमी धम्म ध्वज यात्रा धम्म ध्वज यात्रेला दीक्षाभूमीतून उत्साहात प्रारंभ – महाराष्ट्रभर धम्माची जागृती देऊळगाव राजा शहरात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्याचे वतीने यात्रेचे स्वागत

सिंदखेड राजा (रामदास कहाळे):ज्ञानज्योती महाथेरो व भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुद्धिस्ट समन्वय संघ (BSS महाराष्ट्र) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली धम्म ध्वज यात्रा प्रत्येक घराघरात बुद्ध धम्म पोहचविण्याचे कार्य करणे , धम्म ध्वज यात्रा एक आंदोलन नाही बुद्ध धर्माचा इतिहास प्रत्येक धम्म बांधवापर्यंत गेला पाहिजे या दृष्टीने आयोजन करण्यात आले आहे आज यात्रा दिनांक 23 ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा शहरात आली असता देऊळगाव राजा व सिंदखेड राजा या दोन तालुक्याच्या समता सैनिक दलाच्या वतीने या यात्रेला सलामी देण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभा यांच्या स्वागत करण्यात आले
भंते विनाचार्य यांची धम्म ध्वज यात्रा ‘महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना’च्य समर्थनार्थ आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये जनतेला एकत्र आणून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जनसंवाद साधला जातो. या यात्रेच्या माध्यमातून जनतेला आपल्या अस्तित्वाच्या आणि अस्मितेच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे, तसेच बुद्धभूमीच्या मुक्तीसाठी आणि BT Act 1949 रद्द करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याचा अनुषंगाने ही धम्म ध्वज यात्रा काढण्यात आली आहे
ही यात्रा नागपूर दीक्षाभूमी वरून निघाली असून दादर चैत्यभूमीवर कोणत्या मार्गाने पोहचणार आणि मुकाम कुठे आहे जेणेकरून त्या त्या जिल्ह्यातील प्रत्येक बौद्ध बांधव या यात्रेत सहभागी होतील त्या अनुषंगाने आपण पर्यंत माहिती देत आहेत बघा खालील प्रमाणे
१७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमी नागपूर येथून ऐतिहासिक वातावरणात दणदणीत प्रारंभ झाली.
धम्म ध्वज यात्रा ही बौद्ध चळवळीचे जागरण, समतेचा संदेश व बुद्ध धम्म घराघरात पोहोचविण्याचे कार्य करणार असून, महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सभा व मुक्काम ठेवण्यात आले आहेत.
यात्रेचा सविस्तर दिनक्रम व मुक्काम :
1️⃣ दिनांक 17/08/2025 – नागपूर
सकाळी ९ वा. दीक्षाभूमी येथून यात्रेची सुरुवात झाली
दुपारी २ वा. दीक्षाभूमीवर सभा.
सायं. अमरावती येथे सभा व मुक्काम अमरावती.
2️⃣ दिनांक 18/08/2025 – अमरावती → वाशीम
सकाळी ११ वा. कारंजा लाड येथे सभा व भोजनदान.
संध्याकाळी ५ वा. मंगळपीर येथे सभा.
मुक्काम वाशीम.
3️⃣ दिनांक 19/08/2025 – वाशीम
सकाळी सभा.
मुक्काम पगोडा चिंचोली, वाशीम.
4️⃣ दिनांक 20/08/2025 – वाशीम → अकोला
बाश्री टाकळी मार्गे आगमन.
दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला येथे सभा.
रात्री अशोक वाटिका अकोला येथे सभा.
मुक्काम अकोला.
5️⃣ दिनांक 21/08/2025 –
सकाळी ११ वा. शेगाव येथे सभा.
रात्री मुक्काम बुलडाणा.
6️⃣ दिनांक 22/08/2025 – बुलडाणा
दुपारी सभा.
मुक्काम बुलडाणा.
7️⃣ दिनांक 23/08/2025 – जालना
रात्री सभा.
मुक्काम जालना.
8️⃣ दिनांक 24-25/08/2025 – संभाजीनगर
दुपारी सभा.
मुक्काम संभाजीनगर (२ दिवस).
9️⃣ दिनांक 26/08/2025 – जळगाव
जळगाव येथे सभा.
मुक्काम भुसावळ,
🔟 दिनांक 27/08/2025 – धुळे → मालेगाव
सकाळी ११ वा. धुळे येथे सभा.
संध्याकाळी ७ वा. मालेगाव येथे सभा.
मुक्काम मालेगाव.
1️⃣1️⃣ दिनांक 28/08/2025 – नाशिक
दुपारी सभा.
मुक्काम नाशिक.
1️⃣2️⃣ दिनांक 29/08/2025 – कल्याण → ठाणे
दुपारी सभा.
मुक्काम ठाणे.
1️⃣3️⃣ दिनांक 30/08/2025 – डोंबिवली → ठाणे
दुपारी सभा.
मुक्काम ठाणे.
1️⃣4️⃣ दिनांक 31/08/2025 – ठाणे
दुपारी सभा.
मुक्काम ठाणे.
1️⃣5️⃣ दिनांक 01/09/2025 – मुंबई
चेंबूर येथे सभा.
घाटकोपर येथे सभा.
मुक्काम मुंबई.
1️⃣6️⃣ दिनांक 02/09/2025 – दादर (समारोप सोहळा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिधातूला वंदन.
पहिला टप्पा येथे संपन्न.
ही यात्रा जिथे पोहोचते तिथे “जय भीम – नमो बुद्धाय” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमते. तरुण-तरुणी, महिला, वृद्ध सर्वच जण हातात धम्मध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी यात्रेचे भव्य स्वागत, फुलांचा वर्षाव व भिक्षू संघाचे आशिर्वाद घेतले जात आहेत.
ही धम्म ध्वज यात्रा बुद्ध धम्माच्या जागृतीची, समतेची आणि मानवतेची चेतना महाराष्ट्रभर पोहोचविणारी ऐतिहासिक घटना ठरत आहे.